Home  | Beauty Secrets  |  Wonder Woman  | Baby Names | Nurture Kids | Download Recipes

 

 
 

डाळवांगे (Eggplant Daal) Dal Vange - A tasty combination of brinjal and lentil accompaniment for rice

३-४ मध्यम आकाराची वांगी, १ वाटी तूरडाळ, १ लहान लिंबाएवढी चिंच, १/२ लहान लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून कांदा लसूण मसाला, १ टीस्पून धने पावडर, १/२ टीस्पून जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, १ टेबलस्पून खोबरे, २ लसूण पाकळया, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाणी लागेल तसे.

 
Beauty Secretes Unveiled

10 Steps for Radiant Skin
Discover the remedies in your kitchen!
Arresting hair loss

फोडणीसाठी -
२ टेबलस्पून तेल
जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता

कृती - वांगी धुवुन चिरुन एका वांग्याच्या ८-१० फोडी होतील अशी चिरुन घ्यावीत. चिरलेली वांगी एका बाऊलमधे पाण्यात घालून ठेवावीत. तूरडाळ धुवुन त्यात २ कप पाणी घालावे. त्यात चिरलेली वांगी पाण्यातुन काढुन निथळून घालावीत. कुकरला ३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यावे. खोबरे, लसुण आणि थोडी चिरलेली कोथिंबीर बारीक करुन घ्यावे. चिंच एका बाऊलमधे घालून त्यावर गरम पाणी ओतुन ठेवावे. कुकरचे प्रेशर उतरले की एका पातेल्यात तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी.त्यात वाटलेला लसुन खोब-याचा गोळा घालावा. अगदी हलकेच परतावे. लसुण-खोबरे करपता कामा नये. त्यात शिजलेले डाळ-वांगे घालावे. मीठ, कांदा लसुण मसाला, गुळ घालावा. भिजवलेली चिंच कुस्करुन कोळ काढुन तो पण डाळीत घालावा. गरज असेल तर १/२ वाटी पाणी घालावे. नीट उकळी आणुन वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी. गरम भाताबरोबर किंवा गरम चपातीबरोबर ही डाळ छान लागते.

टीप - १. चिंच आणि गूळ वगळले तरी ही डाळ छान लागते. २. वांग्याऐवजी दोडक्याची एखाद्या दोडक्याच्या फोडी घातल्या तर त्याला डाळ-दोडका म्हणतात आणि त्याची चवही अप्रतीम लागते.
 

 

कढि गोळे (Kadhi Gole preparation of buttermilk, goes well with plain rice.)

गोळ्यांसठि
हरबरा डाळ दिड कप
लसूण, मिरची धणे जिरे पुड, मिठ
कढिसाठि..
बेसन, दहि, कांदा मेथि चे दाणे, कढिपत्ता, जिरे, लवंग, मिरे,हळद, मिठ, साखर, तुप, गरम मसला, हिरवी मिरची, लसुण्-आले paste

क्रुति

ग़ोळे
हरबरा डाळ भिजत घाला ४-५ तास. नंतर लसूण, मिरची धणे जिरे पुड, मिठ घालुन वाटुन घ्या. नेहेमिच्या भज्यांचि consistancy येइल एवढे पाणि घाला. ह्याचे छोटे छोटे गोळे बनवुन तळुन घ्या. तळण नको असेल तर वाफ़वलेले सुद्धा छान लागतात.

कढि
दह्यामधे नेहेमिच्या कढि साठि टाकतो त्यापेक्शा 1 sp जास्त बेसन टाकुन नीट mix करुन घ्या. नंतर हळु हळु पाणि टाकुन mix करा म्हणजे नीट mix होइल. ह्यातच मिठ, गरम मसाला, थोडि चविप्रमणे साखर, हळद आणि आले लसुण paste टाकुन नीट mix करुन ठेवा.

एका भांड्यामधे तुप घाला, तुप तापले कि त्यामधे जिरे आणि मेथि दाणे,लवंग, मिरे टाका. त्यात मिरचि, कढिपत्ता टाकुन भांड्यावर झाकण ठेवुन gas मंद करुन २ मिनिटे राहु द्या म्हणजे कढिपत्त्याच वास भांड्यामधे राहिल. त्यात बारिक चिरलेला कांदा टाका. कांदा गुलाबी रंगाचा झाला कि त्यात कढि साठि बनवलेले मिश्रण टाका. आणि मधुन मधुन हालवुन एक उकळि येवु द्या. कढिला उकळि आलि कि त्यामधे बनवलेले गोळे टाका आणि २ मिनिटांनि gas बंद करुन वरुन बारिक चिरलेलि कोथिंबिर टाका.

 

आमटी (Aamati delicious plain dal with vegetables and seasoned with spices.)

जिन्नस:

तुरीची डाळ अर्धी वाटी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा,
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
२ मिरच्या, ३-४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू
लाल तिखट १ चमचा, धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद

क्रमवार मार्गदर्शन: अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेणे. तेलाच्या फोडणीमध्ये मोहरी, जिरे हिंग, हळद व अर्धा चमचा लाल तिखट व चिरलेल्या मिरच्या घालून लगेचच चिरलेला कांदा व टोमॅटो घालणे. थोडी तीव्र आच ठेवून परतणे. परतून झाल्यावर त्यात अगदी थोडे पाणी घालून मध्यम आचेवर शिजवणे. कांदा व टोमॅटो व्यवस्थित शिजले की मग त्यात अर्धा चमचा धनेजिरे पूड, चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, अर्धे लिंबू पिळून अजून थोडे पाणी घालून थोडी उकळी आणणे. नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ डावेने घोटून घेऊन त्यात घालणे. परत १-२ वाट्या पाणी घालून तीव्र आच ठेवून उकळी आणणे. अधुम मधून ढवळणे.
उकळी आली की परत त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेजिरे पूड व थोडे मीठ घालून अजून थोडी आमटी उकळणे व ढवळणे. वरून थोडे लाल तिखट व धनेजिरे पूड घातल्याने आमटीला रंग छान येतो. आमटी थोडी दाट असू दे. खूप पातळ नको. लिंबू आवडीनुसार कमीजास्त पिळणे.
 


 

 

कुळथाचे (हुलग्याचे) पिठले  (easy to make, made of horsegram flour (kulith pithale) paste, onions and garlic.)

कुळीथ पीठ १/२ वाटी,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
६ते ७ लसूण पाकळ्या,
एखादे आमसुल,
ओले/सुके खोबरे,
कोथिंबिर,
तेल,फोडणीचे साहित्य
कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे,त्यात मीठ घालावे. तेलाची खमंग फोडणी करावी.त्यात लसूण पाकळ्या,मिरच्या,आमसूल घालावे.व हे कुळथाचे पीठ घालावे.खोबरे व कोथिंबिर घालावे.खळखळून उकळू द्यावे,चांगले शिजू द्यावे. हे पिठले पातळच करावे व गरम गरम पिठले वाफाळत्या भाताबरोबर खावे.

 

झणझणीत झुणका  Zunka another version of pithale commonly known as zunka.

साहित्य :

बेसन 250 ग्रॅम,
शेंगदाणा तेल 125 मिलि.,
दोन मोठे कांदे, लसूण पाकळ्या 50 ग्रॅम,
कोथिंबीर, 25 ग्रॅम आले, 75 ग्रॅम हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी.
 
कृती :
झुणका बनविताना सर्वप्रथम बेसन बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. एका पातेल्यात बेसन टाकून त्यात आवश्यक तेवढे पाणी घालावे. हे चांगले हलवावे.
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे. साधारणत: पाच मिनिटांपर्यत तेल तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांद्याचे लांब कांप घालावेत. कांदा थोडा तांबूस झाल्यावर त्यात लसूण, जीरे व आले यांची पेस्ट घालावी.

संपूर्ण मिश्रण तेलात चांगले भाजून घ्यावे. हिरव्या मिरच्यां यात घालून   चांगले तडतडलयानंतर त्यात बेसनाचे पीठ घालावे.  व चमच्याने ढवळत रहावे.  कोथिंबीर, थोडा गरम मसाला घालून मिश्रणात आवश्यक तेवढे गरम पाणी घालावे  आवडीनुसार झुणका पातळ किवा घट्ट करता येतो.

 

 

 अळुची आंबट गोड रस भाजी Colocassia Leaves Curry (Aluchi patal bhaji)

साहित्य - ६-७ काड्या भाजीच अळु बारीक चिरलेल, ३ वाट्या सोललेले वाल, १ बारीक चिरलेला छोटा कांदा , तेल, मीठ, गुळ, चिंच,
वाटलेला मसाला - ४ पाकळ्या लसूण, ३ हिरव्या मिरच्या


कृती - अळु घेताना नेहेमी काळ्या दांड्याचा घ्यावा, कमी खाजरा असतो. पातेल्यात ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. कांदा शिजल्यावर अळु-वाल घालून चांगली वाफ आणावी. वाल शिजत आले की मीठ आणि वाटलेला मसाला घालावा. बोराएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. थोडे पाणी घालावे. एक चांगली उकळी आणून त्यात थोडा गुळ घालावा. मंद आचेवर ५ मिनिट शिजवावे. ही भाजी आपल्या आवडी प्रमाणाने गोड तिखट आंबट करता येते. वरुन कोथिंबीर पेरावी.

Dal, Amti, Kadhi Saar

Bhajis, Chutneys, Raitas, Curries | Chapati, Rice, Pulaav | Dal, Amti, Kadhi Saar

 
delicious  digg  fark   furl    yahoo   blogmarks blink reddit  Window Live