Home  | Beauty Secrets  |  Wonder Woman  | Baby Names | Nurture Kids | Download Recipes

Kids Wallpapers

 

wallpaper kids

 
 

भेंडीची भाजी Okra Bhaaji (Bhendichi bhaaji-kaachrya) crisp and tasty dry bhaaji of Okra

सहित्य : अर्धा किलो भेंड्या, लहान लिंबाएवढी चिंच, चिंचेच्या दुप्पट गुळ, एक चमचा तिखट, 1 चमचा काळा मसाला, ओले खोबरे कोथिंबीर, मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती : भेंड्या धुऊन फडक्याने कोरड्या करून, मग चिराव्यात.  फोडणी तयर करून चिरलेल्या भेंड्या फोडणीत टाकाव्या. चिंच कोळून त्याचे पाणी, तिखट, काळा मसाला, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवावी. ही ‍भाजी शिजत असताना झाकण ठेवू नये. म्हणजे भाजी चिकट होत नाही. शिजल्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

 

ताकातली भेंडी.Okra Bhaaji (Takatli Bhendichi bhaaji )

सहित्य :  भेंडी अर्धा किलो, लाल तिखट १ टी स्पून , हळद अर्धा टी स्पून , जिरे १ टी स्पून , ताक २ वाट्या , मीठ चवी पुरते,  कोथिंबीर २ टेबल स्पून , तेल पाव वाटी.

कृती :
 
भेंडी स्वच्छ धुवून, पातळ कपड्याने नीट पुसून कोरडी करून घ्यावी. नंतर, दोन्ही टोके काढून टाकून, भेंडीचे २ इंच लांबीचे तुकडे करून घ्यावेत.  कढईत तेल तापवून फोडणीला जिरे टाकावे. जिरे तडतडल्यावर, भेंडीचे तुकडे टाकून परतून घ्यावेत. भेंडी अर्धी शिजल्यावर तिखट, हळद, मीठ आणि ताक घालून भाजी मिसळून घ्यावी. मंद गॅसवर भाजी शिजवून ताक जरा आटले की खाली उतरवावे. जेवण्या आधी कोथिंबीर भुरभुरून घ्यावी.  
 

 

चटपटीत बटाटा भाजी (Simple Potato Bhaji - Batata Bhaji a very famous bhaaji of potato, goes well with puris)

सहित्य : २ ते ३ मोठे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, पाव चमचा जिर , २ चमचे साखर . अर्धे लिंबू चवी पुरते मिठ दिड चमचे तुप

कृती :
 :
बटाटे उकडुन त्याच्या फोडी कराव्यात. भांड्यात तुप घालुन जिर फोडणीला घालावे. मग त्यात मिरची पुड घालावी व लगेच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालुन ढवळावे. नंतर वरुन मिठ, साखर घालावी, लिंबू पिळावा आणि परतून ५ मि. वाफ आणावी.  
 

 

सिमला मिरचीची भाजी  Green Bell Peppers Bhaaji (Simla Mirchi chi bhaaji) a crisp preparation of bell peppers 

साहित्य: सिमला मिर्ची ५,  दाण्याचा कूट ३ चमच, कांदा १,  हलद,  लाल तिखट, आमचूर पावडर 1tsp

कृति :
सिमला मिर्ची धुवून चिरून घ्या. कढईमधे तेल तापवून त्यात कांदा परता ,कांदा परतल्यावर त्यात ,मिर्ची घाला व एक वाफ येऊ दया ,वाफ आल्यावर त्यात ,हलद तिखट,आमचूर पावडर,व दाण्याचा कूट घाला चवीपुरते मीठ,घालून अजुन एक वाफ येऊ दया व गैस बंद करा . (वाटल्यास थोड़ा गरम मसाला वापरू शकतो).  लवकर होणारी व मस्त चव असणारी भाजी तयार

 
 

भरली वांगी Stuffed Brinjal Curry (Bharli vangi) brinjals stuffed with spicy masala

साहित्य : वांगी ५ ते ६, दाण्याचा कुट १/२ वाटी, आले लसुन पेस्ट २ चमच, खसखस,मिरे,  नारळ(अंदाजे) पेस्ट २ चमच , धने जिरे पुड २ चमच
गरम मसाला पावडर १ चमच , आमचूर पावडर २ चमच , टमाटर १ , कांदा १

कृति:
वांगी धुवून कोरडी करा व चिरून घ्या (उभा आणि एक आडवा छेद द्या) कढईमधे तेल गरम करुन त्यात कांदा परतवून घ्या,आता त्यात आले लसुन पेस्ट ,खसखस मीरे पेस्ट घालावी , तेल सुटु लागल्यावर ,त्यात बरिक चिरलेला टमाटर ,लाल तिखट्,ह्ळद,आमचूर पावडर, गरम मसाला ,धने जीरे पुड ,मीठ ,गुळ घालुन टमाटर गळेस्तोवर शिजवावे ,बाजुला ठेवुन ठण्ड होउ द्या ,त्यात दाण्याचा कूट मिक्स करा , हा मसाला वांगयांमधे भरा व बाजूला ठेवा ।
आता कढईमधे तेल गरम करा, हिंग ,मोहरीची फोडनी घाला ,त्यात शिल्लक राहिलेला मसाला परता,तेल सुटु लागल्यावर त्यात वांगी घाला व चांगली वाफ येऊ दया एक वाफ आल्यावर त्यात थोड़े पानी घाला (रस्सा जसा पाहिजे तसे ) अणि परत दोन तीन वाफ येइपर्यंत शिजवा .
 

 

वांगे भरीत Eggplant Curry (Vangyache bharit) spicy curry made of mashed eggplant and seasoned with spices.

 

साहित्य:  १ मोठे वांगे, , ३-४ लसुण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, १ वाटी चिरलेली कांद्याची पात, १/२ वाटी चिरलेली कोथींबीर, मीठ चवीप्रमाणे, मुठभर कच्चे शेंगदाणे, सुक्या खोब~याचे काप मुठ्भर, फोडणीसाठी तेल (नेहेमीपेक्षा थोडे जास्त), फोडणीचे साहित्य.,
 
कृती - वांगे भरीत करण्यासाठी भाजुन घेतो तसे भाजुन घ्यावे.  भाजलेल्या वांग्याची साल काढून टाकुन गर बाजुला ठेवावा. लसुण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक करुन घ्याव्यात. लसुण-मिरची बारीक झाल्यावर त्यात वांग्याचा गर घालुन एकजीव करुन घ्यावा. आता कढईमधे तेल तापायला ठेवुन त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालुन परतावे. खोबरे सोनेरी रंगावर भाजले गेले की त्यात कांद्याची पात घालुन २-३ मिनीटे परतावे. त्यावर वांग्याचा गर, मीठ टाकुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. वरुन कोथींबीर घालुन २-३ मिनीटे परतुन घ्यावे.

टीप - हे भरीत खानदेशी पद्धतीचे आहे. व्यवस्थीत तिखट असते त्यामुळे आवडत असेल तर मिरच्या वाधवायला हरकत नाही. त्यात मसाला वगैरे कही घालत नाहीत. भाकरी, पुरी, चपाती कशाहीबरोबर अप्रतीम लागते.
 

 

पनीर भुर्जी (Paneer bhurji goes well with bread, parathas or even steamed rice and dal.)

साहित्य: पनीर २५० ग्राम, कांदा(बारीक़ चिरलेला) २, लिंबाचा रस २ चमच, हिरवी मिर्ची २, आले/२ इंच, लसून १ कळी, धने जीरे पूड १ /२ चमच, गरम मसाला १/२ चमच

कृति:
प्रथम पनीर कुस्करून घ्यावा .कढईमधे तेल गरम करुन त्यात हिंग मोहरीची घालून कांदा परतवून घ्यावा.कांदा परतल्यावर त्यात हिरवी मिर्ची (बारीक़ कापलेली /पेस्ट ),आले ,लसून(बारीक़ केलेले) घालून परता, आता त्यात ,हळद,तिखट (वाटल्यास)गरम मसाला,धने जीरे पूड घालून अजुन जरा परता ,शेवटी पनीर , मीठ ,लिंबाचा रस ,घालून एक वाफ येइपर्यंत शिजवा .कोथिम्बिर घालून गरम गरम फुलक्या सोबत सर्वे करा ।
(यात आवडत असल्यास कसूरी मेथी ही वापरू शकतो छान चव येते )
 

 

वांगी बटाटा रस्सा Potato Curry (Batatyacha rassa) tasty preparation of potatoes and other vegetables

साहित्य:  वांगी पाव किलो , बटाटे पाव किलो , कांदे अर्धा किलो , सुके खोबरे १०० ग्रॅम (२०० ग्रॅमपर्यंत चालेल) , लसूण एक मोठी गड्डी (दोन गड्ड्या चालतील) , तेल, फोडणीचे साहित्य, मीठ w

कृती :
 

वांगी व बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत.  वांग्यांचे मध्यम काप (अर्ध्या पेराच्या आकाराचे) करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत.  बटाट्यांचे (सालीसकट) मध्यम काप करून पाणी भरलेल्या पातेल्यात टाकावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा.  सुके खोबरे जाड किसणीने किसून घ्यावे. लसूण सोलून व ठेचून घ्यावी

कढईत तेल (तीन मोठे डाव) तापवावे. ते धुरावल्यावर मोहरी घालावी. ती तडतडल्यावर ज्योत बारीक करून हळद, चिमूटभर मेथीदाणे घालावेत. मग ठेचलेली/ला लसूण घालून परतावे. लसूण नीट (लालसर) तळल्यावर कापलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी. वरून झेपेल तेवढे लाल तिखट घालावे (रंग पाहिजे पण तिखटपणा नको असे असल्यास कश्मिरी मिरच्यांचे तिखट वापरावे).  हालवत राहावे. दोन मिनिटांनंतर त्यात किसलेले सुके खोबरे घालावे आणि ज्योत बारीक करावी. सर्व मिश्रण मंद आचेवर नीट परतून घ्यावे.

पाच मिनिटांनंतर त्यात कापलेल्या बटाट्याचा फोडी घालाव्यात आणि ज्योत मोठी करून मिश्रण हालवावे. खोबऱ्याचे तेल सुटू लागले की वांगीकाप घालावेत. हालवत राहावे. ज्योत एका मिनिटानंतर बारीक करावी.

झाकण ठेवून आठदहा मिनिटे शिजवावे. मध्येच एकदोनदा उलथण्याने हालवून घ्यावे. एव्हाना वांगी-बटाटे अर्ध्याहून जास्त शिजले असतील. वेगळ्या पातेलीत अर्धा लिटर पाणी उकळावे आणि भाजीत घालावे. भाजी रटारटा शिजवून घ्यावी.  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

 

 

डाळ कोबी Cabbage Bhaaji (Kobi chi bhaaji) bhaaji made of cabbage and chana dal


सहित्य : बारीक चिरलेला कोबी ४-५ वाट्या , हरबरा डाळ अर्धी वाटी, , हिरव्या मिरच्या १-२, लाल तिखट १ चमचा , मीठ, गूळ सुपारीएवढा , ओला नारळ अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे

कृती :
 हरबरा डाळ ३ तास पाण्यात भिजत घालणे. फोडणीमध्ये मिरच्यांचे तुकडे व हरबरा डाळ घालून १-२ वेळा वाफेवर शिजवणे. नंतर त्यात चिरलेला कोबी घालून मध्यम आचेवर शिजवणे.  थोडे पाणी घालून पातेलीवर झाकण ठेवणे. ५ मिनिटांनी झाकण काढून परतणे. असे थोडे थोडे  पाणी घालून  ५-६ वाफा देवून शिजवणे. नंतर त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ व गूळ घालून परत २-३ वेळा वाफेवर शिजवणे. सगळ्यात शेवटी ओला नारळ व कोथिंबीर घालणे. या भाजीत शिजवण्यापुरतेच पाणी घालणे नाहीतर पांचट होते.  नुसती खायला पण छान लागते.

 

तोंडल्याची भाजी Gherkins Bhaaji (Tondlichi bhaaji-kaachrya) crisp bhaaji of gherkins.

सहित्य : अर्धा पाव तोंडली २ बटाटे अर्धी वाटी दाण्यांचा कुट तिखट - मीठ फोडणीसाठी कडीपत्त्ता-तेल-जिरे-मोहरी- हळद कोथिंबीर

तोंडल्याच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. बटाट्याच्या पातळ चकत्या ( लहान आकारात) करून घ्याव्यात. कढईत तेल टाकून त्यात फोडणीचे साहित्य घालावे.तिखट घालावे. त्यात तोंडली व बटाट्याच्या चकत्या परतून घ्याव्यात. दाण्यांचा कुट व चवीपुरते मीठ घालावे. शिजण्यासाठी थोडेसे पाणी घालावे. मंद आच करून झाकण ठेवावे. थोड्यावेळाने कोथिंबीर पेरावी व पाच मिनिटान्नी गॅस बंद करवा.  झटपट होते आणि छान लागते.
 

 

तोंडल्याची भाजी - तोंडल्याची एक वेगळी रेसिपी (Tondlichi bhaaji) Gherkins Bhaaji in Karwari style.

पाव किलो तोंडली, दहा ते बारा लसुण पाकळ्या, तीन चार लाल मिरच्यांचे तुकडे, जिरे, हिंग लसुण, ओले खोबरे

तोंडली ठेचुन घ्यावीत. पुर्वी ती पाट्यावर वरवंट्याने ठेचत असत. पण ते शक्य नसेल तर, एका खोलगट भांड्यात एकेक तोंडले घेऊन, ते जड बत्ता, बाटली किंवा लाटण्याने ठेचले तरी चालते.  लसुण पाकळ्या ठेचुन घ्याव्यात. तीन चार लाल मिरच्यांचे तुकडे करावेत. तेलाची जिरे, हिंग लसुण व मिरच्या घालुन फ़ोडणी करावी. त्यात ठेचलेली तोंडली घालावीत. झाकण ठेवुन शिजवावे. मग त्यात खवलेले ओले खोबरे व मीठ घालुन, भाजी कोरडी होईपर्यंत परतावी.
हा एक कारवारी प्रकार आहे, खुप छान लागतो

 

दम आलू (काश्मिरी पद्धत) Dam Aloo (Dry Potato Curry) A delicious side dish made out of potatoes

उकडलेले बटाटे -१० छोटे तेल(कोणतेही)- ४ चमचे लवन्ग-४-५ हिरवी इलायची-४-५ काळी इलायची-२,हिन्ग(२ च), आल्याची पूड(१ च), काश्मिरी मिरची पूड(१ च) गरम मसाला (१/२ च) दही(२ मोठे च), पाणी(२ कप), मीठ(चवीनुसार तेल तळ्न्ण्यासाठी

कढईत तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे तांबूस होईपर्यंत तळून घ्यावे आणि बाजूला काढन ठेवावेत. आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात हिरवी इलायची,लवन्ग, मीठ,हिन्ग,आल्याची पूड आणि काश्मिरी मिरची पूड घालावे.थोडसे परतून घ्यावे.मसाले करपू नयेत ह्याची काळजी घ्यावी. आता त्यात दही घालून एकसारखे हलवावे.नंतर त्यात पाणी घालून त्याला एक उकळ आणावी.आता हळूहळू त्यात बटाटे सोडावेत.मंद आचेवर ठेवावे आणि उकळावेत.वरून गरम मसाला घालावा. गरम मोकळ्या भातावर खायला छान लागतो. (कांदा टोमेटो घालायची गरज भासणार नाही)
 

 

शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney)

१ कप भाजलेले शेंगदाणे, २-३ पाकळ्या लसूण (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा) ,१ टीस्पून जीरे, १ टीस्पून साखर, १-२ टीस्पून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करावे), १-२ टीस्पून लाल तिखट

कृती - मिक्सरच्या भांड्यात निम्मे शेंगदाणे घालावेत त्यावर लसूण, तिखट, जिरे, मीठ, साखर घालावे. वरून उरलेले दाणे घालावेत. हळुहळू पल्स करत करत चटणी बारीक करावी. भांड्यात काढून तिखट मीठ व्यवस्थीत आहे क ते पहावे. कमी जास्त हवे असल्यास मिसळून डब्यात भरावे.

 

हिरवी चटणी (narlachi hiravi chatani) Green chatni made of coconut, green chilies, and coriander leaves

साहित्य: १ कप ओले खोबरे, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, ५-६ हिरव्या मिरच्या १/२ टिस्पून जिरेपूड मीठ

कृती: खोबरे, हिरवी चटणी: मिरची, कोथिंबीर, जिरेपूड आणि मीठ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.

 

चिंचगूळाची चटणी (Chichagulachi Chatani ) Chatni made with tamrind and jaggery

साहित्य: १/४ ते १/२ कप चिंच १/२ ते ३/४ कप गूळ १ टिस्पून जिरेपूड १ टिस्पून धणेपूड १ कप पाणी किंचीत मिठ

कृती: चिंच १ कप पाण्यात घालून ३ मिनीटे उकळवून घ्यावी. गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवावे. नंतर गूळ घालून ठेवावा. चिंच-गुळाचे पाणी गार झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आणि गाळण्याने गाळावे. धणे-जिरेपूड आणि मिठ घालून मिक्स करावे.

 

मिरचीचा ठेचा Hivya Mirchicha Thecha (Green Chilli- garlic chutney) is enough to spice up any meal.

साहित्य- ५ हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, कोंथिबीर, मीठ.

कृति- प्रथम हिरव्या मिरच्या गँसवर थोडया तेलात भाजून घ्यावेत, नंतर मिक्सरमध्ये मिरच्या टाकून घ्यावेत त्यात मीठ लसुण पाकळ्या, कोंथिबीर टाकून झाल्यानंतर एकदाच मिक्सरमध्ये मिरच्या फ़िरवून घ्यावेत. त्यात शेंगदाण्याचा कूट तिखटपणा कमी करण्यासाठी घालू शकतॊ. ठेचा तेलात परतवून घ्यावा.

 

मेतकुट Metkoot a spice powder usually to be eaten with plain rice

दोन वाट्या चण्याची डाळ, एक वाटी ऊडदाची डाळ, अर्धी वाटी तांदुळ, पाव वाटी गहु, पाव वाटी काळि मोहरी, दोन चमचे जिरे, दोन चमचे हिंगाची पुड, दोन तीन लाल मिरच्या, अर्धा चमचा मिरीदाणे, एखादे हळकुंद, दोन चमचे धणे, अर्धे जायफ़ळ, एखादा सुंठिचा तुकडा.

शक्यतो लोखांडी कढईत, धान्ये भाजायला घ्यावीत. हि धान्ये कोरडीच भाजायची असल्याने खुप वेळ लागतो. पण तरिहि संयमाने भाजायची, प्रत्येक धान्याचा खमंग वास आला पाहिजे, तरिहि काहिहि करपता कामा नये. हिंग, हळकुंड, जायफळ वैगरे भाजता येत नाही, त्यामुळे ईतर धान्ये भाजताना, शेवटी ते टाकुन जरा गरम होवु द्यावे. जसजसे भाजत जाऊ तसतसे ते एखाद्या पेपरवर पसरत जावे. त्यावर पेपर झाकावा म्हणजे वाफ धरत नाही. मग सगळे एकत्र करुन अगदी बारिक दळावे. मैद्याच्या चाळणीने चाळुन घ्यावे. दोन तीन बाटल्यात भरावे. वरती हिंगाचा खडा ठेवावा. धान्ये अशी खमंग भाजल्याने पाण्याचा अंश निघुन जातो, व ते खुप टिकते.
 

 

कांद्याची कोशिंबीर Maharashtrian Style Cucumber Salad / Raita (Khamang kakadi, Kakadi Koshimbir)

साहित्य : ४ मध्यम आकाराचे पांढरे कांदे, दही, मिठ, साखर,पाव चमचा मिरेपुड,चिमुटभर कोथिंबिर

कृती:
कांदे सोलुन चिरुन घ्या. त्यात चविप्रमाणे मीठ ,साखर घाला. मीरेपुड घाला. वरुन हवी असल्यास कोथिंबिर पेरा. दही. सरसरित करुन घाला. कोशिंबीर तय्यार. हया मधे हिरव्या मिरच्या भाजुन घालुन खूप छान लगतात!
 

 

खमंग काकडी Maharashtrian Style Cucumber Salad / Raita (Khamang kakadi, Kakadi Koshimbir)

साहित्य: २ कप चोचवलेली काकडी,  ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून १ टिस्पून लिंबाचा रस १/२ टिस्पून तूप १/४ टिस्पून जिरे ३ ते ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट २ टेस्पून चिरलेली कोथिंबीर १ टिस्पून साखर चवीपुरते मिठ

कृती:
१) #2366;कडीची शेवटची दोन टोके कापावीत, आधी काकडी कडू नाहीये ना! हे चव घेवून पाहावे. नंतर काकडी सोलून चोचवून घ्यावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मिठ चोळून एका वाडग्यात ठेवावे. मिठामुळे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून टाकावे तसेच चोचवलेली काकडी दोन्ही हाताने पिळून त्यातील अधिकचे पाणी काढून टाकावे. अशी पाणी काढून पिळलेली टाकलेली काकडी आपल्याला २ कप लागेल.
२) ही काकडी वाडग्यात घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्यांतील थोडी मिरची घालून फोडणी करावी व काकडीत घालावी. लिंबाचा रस घालून मिक्स करावे.
हि चविष्ट अशी खमंग काकडी उपवासाला किंवा इतर दिवशीही कोशिंबीर म्हणून जेवणात समाविष्ट करू शकतो.
 

 

कोबीची पचडी - Kobichi Pachadi - Tasty salad of shredded cabbage

साहित्य: २ कप किसलेली कोबी २-३ चमचे शेंगदाणा कूट २ चमचे तेल १/२ टिस्पून जिरे १/४ टिस्पून हिंग १/४ टिस्पून हळद २ हिरव्या मिरच्या १ चमचा लिंबाचा रस १/२ चमचा साखर चवीपुरते मिठ १/४ कप चिरलेली कोथिंबीर

कृती: १) एका वाडग्यात किसलेली कोबी घ्यावी. लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करावे. तेलात जिरे, हिंग, हळद आणि मिरचीचे तुकडे फोडणीस घालावे. हि फोडणी किसलेल्या कोबीत घालावी. २) शेंगदाण्याचा कूट, चवीपुरते मिठ, साखर, लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर किसलेल्या कोबीत घालावे व नीट मिक्स करावे. हि पचडी तोंडीलावणी म्हणून छान लागते

Bhajis, Chutneys, Raitas, Curries | Chapati, Rice, Pulaav | Dal, Amti, Kadhi Saar

 
delicious  digg  fark   furl    yahoo   blogmarks blink reddit  Window Live