| |
मिक्स वेजीटेबल पुलाव |
|
साहित्य:
१ वाटी तांदुळ
१/२ वाटी फरसबी (बारीक़ केलेली)
१/२ वाटी गाजर (बारीक़ चिरलेला )
१/२ वाटी मटारचे दाने
१ बटाटा (मध्यम आकाराचे तुकडे)
पनीरचे तुकडे
जीरे फोडणीसाठी
कृति:
सर्वप्रथम तांदुळ धुवून पानी निथळुन घ्यावे व त्याचा मोकळा भात शिजवून घ्यावा व हा भात ठण्ड करायला बाजूला ठेवावा .सर्वे भाज्या (पनीर सोडून) वाफवुन घ्या .आता कढईमधे तेल तापवून त्यात
जीरे घालून वाफविलेल्या भाज्या व पनीरचे तुकडे परतवून घ्या ,मीठ , चिमुटभर हळ्द घाला व एक वाफ येईस्तोवर शिजवा ,आता शिजवलेला भात घाला व वरुन लिंबाचा रस पिळुन घ्या , व्यवस्थित मिक्स करून,एक वाफ येईस्तोवर शिजवा .
दह्याच्या रायत्यासोबत सर्वे करा .............. |
| |
लेमन राइस |
|
साहित्य :
तांदुळ १ वाटी
गाजर ,फरसबी ,मटर (बारीक़ कापलेले ) १ वाटी, मटर १/२ वाटी
सुक्या लाल मिरच्या ३ ते ४
२ लिबांचा रस
उडद डाळ २ चमच (१/२ तास पाण्यात भिजत घातलेली)
चना डाळ २ चमच (१/२ तास पाण्यात भिजत घातलेली)
कृति :
प्रथम भात मोकळा शिजवून घ्यावा व ठण्ड करुन घ्यावा . कढईमधे तेल तापवून
त्यात जीर ,हिंग ,कढीपत्ता घालून त्यात उड़द व चना डाळ,सुक्या लाल
मिरच्या परतुं घ्या,आता त्यात कापलेल्या भाज्या घालून शिजू द्या ,भाज्या
शिजल्यावर (खुप शिजायला नकोत )त्यात ,मीठ , हळ्द व लिबांचा
रस घालावा व उकळी येऊ द्यावी ,उकळी आल्यावर त्यात भात घालावा व
मिक्स करुन एक वाफ येऊ द्यावी. गरम गरम लेमन राइस सर्व करा.
|
| |
मटण मखनी पुलाव
|
|
साहित्य : मटण ३५० ग्रॅम, बासमती तांदूळ दीड कप, चणाडाळ अर्धा कप, दही अर्धा कप, कांदे तीन, आले-लसूण पेस्ट १ टेबलस्पून, वेलची दोन, दालचिनी एक तुकडा, बडीशेप १ टेबल स्पून, धणे एक टेबलस्पून, काळीमिरी पाच-सहा, लवंग एक-दोन, हिरव्या मिरच्या तीन-चार, साजूक तूप २ टेबलस्पून, गरम मसाला पूड एक टीस्पून, मीठ.
कृती : चणा डाळ दोन तास भिजवा. दोन कांदे उभे चिरून ब्राऊन रंगावर तळून घ्या. एक कांदा चिरून घ्या. मिरच्यांचे तुकडे करा.
मटणाला दही, मीठ, आले, लसूण पेस्ट लावून ठेवा.
एका मलमलच्या कपड्यात धणे, बडीशेप, काळेमिरे लवंग, वेलची, दालचिनी घालून पुरचंुडी बांधा.
कुकरमध्ये मॅरिनेट केलेले मटण, चिरलेला कच्चा कांदा, हिरवी मिरची, मसाल्याची पुरचुंडी, एक कप पाणी घालून शिजवून घ्या.
कुकर उघडल्यावर मटणाचे तुकडे काढून उरलेले पाणी गाळून घ्या. त्यात आणखी पाणी घालून साधारण तीन कप बनवा.
कुकरच्या भांड्यात एक चमचा तूप घालून त्यात मटणाचे तुकडे तळून काढा व बाजूला ठेवा.
उरलेले तूप घालून त्यात तांदुळ व चणा डाळ घालून परता मटणाचा अर्क, मीठ घाला आणि शिजवा.
भात शिजल्यावर त्यात गरम मसाला, मटणाचे तुकडे, तळलेला कांदा घालून घट्ट झाकण ठेवून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर ठेवा.
कांदा आणि दह्याच्या कोशिंबिरीसोबत र्सव्ह करा.
|
| |
मसाले भात
|
|
साहित्य :-
तिखट मसाला २ चमचे
४ ते ५ काळिमिरी, ३ ते ४ लवंगा, ४ छोटे दालचिनिचे तुकडे, २ दगडफ़ुल, २ तमालपत्र,
२ चमचे आले लसुणची पेस्ट
२ मोठे डाव तेल
लांब चीरलेले गाजर, फ़रजबी, टोमॅटोचे तुकडे २ वाटीभरुन
१ बटाटा मध्यम काप केलेला
२ मोठे पेले तांदुळ
चवीनुसार मीठ
कृती :-
तांदुळ स्वच्छ धुवुन घ्यावेत. कुकरमधे तेल गरम तेल गरम झाले की त्यात सर्व गरम मसाला घालावा. नंतर आल,लसुण पेस्ट, सगाळ्या
भाज्या, बटाटे घालवेत आणि मसाल घालुन चांगले परतुन घ्यावे. सगळ्यात शेवटी तांदुळ टाकुन चंगले परतुन, त्यात तांदुळ बुडुन २ इंच पाणि राहिल एवढे पाणी घालुन कुकर लावावा.
३ शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा.
|
| |
दाल खिचडी
|
|
जिन्नस :
तूर डाळ ३ वाट्या, तानदूळ २ वाट्या
टोमॅटो १,कान्दे २,
फ़ोडणीसाठी-आले लसूण पेस्ट १ चमचा,लाल मिरच्या २ ,तेल,हिन्ग , गरम मसाला १ चमचा, तमालपत्र २,दालचिनी १, जिरे मोहरी १ चमचा
मीट,साखर १ चमचा,
हळद, लाल तिखट १/२ चमचा प्रत्येकी, कोथिम्बीर
साजूक तूप आवडीप्रमाणे :)
प्रथम तूर डाळ नीट धुऊन कूकरमध्ये शिजवून घ्यावी. तांदूळ धुऊन भिजत ठेवावेत. डाळ रवीने नेहमीप्रमाणे हाटून घ्या. लहान कूकरमध्ये तेल घालून त्यात तमालपत्र ,दालचिनी घालून परता . आता जिरे मोहरी , हिंग , आणि मिरच्यांचे प्रत्येकी दोन तुकडे करून घाला. आता कांदा बारीक चिरून घाला. कांदा खमंग परतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घाला.( कांद्यानंतर आले लसूण पेस्ट घालण्यामागे ती पेस्ट कढईला चिकटू नये हा हेतू...) आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो चांगला मऊ होईपर्यंत परता.आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून परता. मंद आचेवर थोडे शिजू द्या.आता त्यात शिजवलेली डाळ घालून त्यात (साधारणपणे या प्रमाणातील डाळ तांदूळ शिजण्यासाठी जेवढे पाणी लागते त्यांपेक्षा जास्त )पाणी घालावे.भिजवलेला तांदूळ त्यात घालावा. नीट ढवळून मीठ घाला, वरून कोथिंबीर घालून शिजू द्या. गरम असतानाच साजूक तूप घालून खायला द्या.
हा पदार्थ घट्ट न होता पातळच राहू द्यावा म्हणजे चमच्याने खाण्याइतपत
पातळ असावा |
|
 |
|
कोकण कड्यावरील सुर्यास्ताचे विलोभनीय फ़ोटोज
येथे पहा

|
|
|