|
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा
more like
this
अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून 'वराती
' ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके, कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून
चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे
रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली.
त्यावर ते म्हणाले, 'तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले, की गाऊन दाखवा.' तर
नीला म्हणाली,'बरोबर आणला नाही.'
(- सौ. करुणा देव, रविवार सकाळ, ७ नोव्हे. १९९३)
more
like this
|