धन्यवाद देण्याची आनंददायक प्रथा

Saying Thank You

काहीतरी प्रोब्लेम मधे असताना नेहमीच आपल्या देवाला आठवून "सोडव रे बाबा " नकळत बरेच जण म्हणतात . पण जेव्हा प्रोब्लेम नसतात तेव्हा मधेच कधीतरी डोळे मिटून , गुडघे टेकून देवाला "आजचा दिवस चांगला गेला रे बाबा , थंक यु " असे म्हंटले आहे , रस्त्यावरून जाताना , ट्रेन मधून उतरताना तुम्हाला वाट करून देणाऱ्या माणसांना तुम्हीकधी धन्यवाद म्हंटले आहे . एकदा हे करून पहा , त्या क्षणामध्ये समोरच्या माणसाला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद तो तुम्हालाही देऊन जातो
अर्थात मी हे रोजच करत नाही पण जेव्हा माझ्याकडून केले जाते तेव्हा नंतरचे १-२ तास का होइना आनंदात जातात आणि कधी कधी अख्खा दिवस हि छान जातो

नक्की होत …. बर आपण याची कारणं वाचूया

१] या मुळे काही क्षणा साठी तरी आपण आपल्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी आठवतो आणि त्यांच्या बद्दल आनंद व्यक्त करतो
२] यामुळे वाईट्ट गोष्टी हि चांगल्या होऊन जातात ऑ फीस मध्ये खूप काम आहे , प्रोब्लेम्स सोडवायाचेत … पण याच गोष्टी मुळे आपण काही तरी शिकतोय नवीन निर्मिती करू शकतोय या सृजन तेची जाणिव आपल्याला आपोआपच होते
३] या छोटाश्या कृती मुळे आपण कोणालातरी खुश करतो आणि मग ती व्यक्ती खुश होऊन अजून चार लोकांना आनंदात ठेवते thesecret.tv मधल्या जादू वर तुमचा विश्वास तर काही क्ष णां चा आनंद दुपटीने आपल्याला कधी ना कधी तरी का होईना परत मिळतो
४] यामुळे नकळतच आपण कुठल्या गोष्टी न महत्व द्यायचे ते शिकत जातो . नको असलेल्या वायफळ गोष्टीना दुधातल्या माशी सारखे काढून टाकायचे जातो मग या च सकारात्मक गोष्टी भर साखरे सारख्या आपल्या आयुष्या तली लज्जत शतपटीने वाढवतात .