२१ उत्कृष्ट सुचना - आयुष्य जगण्याच्या

21 tips to live life

२१ उत्कृष्ट सुचना - आयुष्य जगण्याच्या

१] उगाचच भट क ण्या साठी प्रत्येक दिवसाचा थोडा वेळ राखून ठेवा
२] जेव्हा कधीही सं भ्रमात असाल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या
३] जेव्हा तुम्हाला वाटत तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे . त्या वस्तूचे नाव पुढच्या महिन्याच्या आजच्या तारखेला लिहून ठेवा . जेव्हा ती पुढच्या महिन्याची ठराविक तारीख उजाडेल तेव्हा जर ती वस्तू खरोखरच हवी असेल तर नक्की घ्या
४] कोणतीच कठिण गोष्ट इतकी गंभीर नसते जेवढी ती प्रथम दर्शनी वाटते
५] तुमची सगळ्यात आवडती व्यक्ती काहींही म्हणत असेल , तरी तुम्ही जे काही बोलाल त्याचा अर्थ "तू मला खूप आवडतेस / आवडतोस "असाच असेल असा प्रयत्न करा.
६] सगळ्यात नावडती पण महत्वाची गोष्ट सर्वात आधी मन लावून करा आणि संपवा
7] प्रत्येक मुक्काम तुमच्या मनाप्रमाणे असेलच अस नाही म्हणुनच घाईगर्दीत प्रवासातली मजा घालवू नये .
८] तुमच्या मनाच्या कप्प्या मध्ये लिहून ठेवा "आजचाच दिवस वर्षातला सर्वात चांगला दिवस आहे "
९] तुमचे ट्विटर चे फॉलो अर्स किंवा फेसबुक चे लाइक्स तुम्हाला रात्री घरी आल्यावर प्रेमाने जेवायला वाढत नाहीत
१०] तुमच्या फेसबुक / ट्विटर / लीन्कड इन च्या प्रोफ़ाइल मधे "साहसी " शब्द पण टाका आणि साहसी बना
११] तुम्ही सगळयांना आवडायलाच पाहिजेत अशा प्रयत्नात राहू नका
१२] तुमचा जन्म आणि तुमचे शरीर जगातल्या सर्वात "अमेझिंग " गोष्टी आहेत , त्यांचा मान ठेवायला शिका
१३] कुठल्या तरी अशा विचित्र (?) गोष्टी मध्ये प्राविण्य मिळवा जी तुमच्या नेहमीच्या रुटिन पेक्षा एकदमच वेगळी असेल … बुद्धीबळ, पोहणे, गाणे किंवा ट्रेकिंग रेपलिंग काहीही
१४] दिवसातून एक तास ७ किंवा ७० वर्षाच्या व्यक्ती बरोबर काढा तुम्हाला तुमच्या जगण्याचा सूर सापडेल 
१५] सतत कुरकुर करणारया माणसापासून चार हात लांब रहा. आणि आपले मित्र मैत्रिणी काळजी पूर्वक निवडा
१६]  सकाळी उठल्यावर थंड  पाण्याने अंघोळ करा तुमच्या शरीराला आणि मनाला ताजे तवाने तवाने करण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय 
१७] आठवडयातून एक दिवस "नो टीवी " दिवस साजरा करा … करून तर बघा .
१८] एकदा "The Secret Power of attraction" पुस्तक वाचा .
१९] आपल्या आवडत्या माणसांचे फोन नंबर लक्षात ठेवून डायल करा … हि एक जादू आहे … नंबर काही दिवसातच लक्षात राहू शकतात आणि तुमच्या स्मरण शक्तीला व्यायाम मिळतो
२०] येवढं सगळ करूनही मनात कुठेतरी काहीतरी खुपतेच … जखमा होतात … तेव्हा सगळ्यां तक्रारी , दु:ख , मानापमान एका चिटो ऱ्या वर लिहूम काढा आणि तो कागद उंच इमारतीवरून १० तुकडे करून फेकून द्या किंवा जाळून टा कल्यास उत्तम
२१] दवबिंदू वरील कविता, लेख वाचायला पुन्हा पुन्हा या आणि या साईट चा प्रसार करा