Marathi Lekh

कळत पण वळत नाही 

कळत पण वळत नाही 

आपल्यला माहित असतं आपण कुठल्या कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे , भाज्या फळे खाल्ली पाहिजेत , मीठ साखर कमी केली पाहीजे , चहा कॉफी पाहिजे … सिगारेट सोडायचिय… किंवा मला तबला शिकायचंय लहान पणी राहून गेलाय … आपल्याला कविता लिहायला आवड तात पण कधी लिहायला बसण जमतच नाही. पण एखादी गोष्ट माहित असणे आणि खरोखरच करणे यामध्ये फरक आहे 

आपल्याला माहित असतं आपण हि टाळाटाळ चालवली ती बंद करण आवश्यक आहे कोणा कोणाच्या नेट वरच्या कविता वाचून आपली आई , कुटुंब एवढाच काय आपल्या स्वता साठी हि वेळ काढण आवश्यक आहे हे कळत . कधी वाटत सगळा व्याप बंद करून … फेसबुक ट्विटर न्यूज अपडेट्स बंद करून टाकावे आणि डोंगरावर उगाचच फिरत रहाव मनाला वाटेल तस … 

कधीतरी आपल्या डोक्यात विचार येतो मग आपण त्याच्या वर खूप काही वाचतो , बरच काही रिसर्च करतो आणि मग काही तरी महत्वाच काम येत ते झाल्यावर नक्की करूया असा म्हणून कामा त डोक घालतो अणि असे होता होता आपले निश्चय कधी विसरून जातो ते कळत पण नाही . पण २४ तांसांच्या जीवघेण्या तारांबळी मध्ये काय केले म्हणजे हे सगळे शक्य होईल हे कळत नाही याला शास्त्रीय भाषेत The Knowing-Doing Gap म्हंटले जाते खरच का सगळ इतक अशक्य आहे ? अस काय असत कि आपण आपले निश्चय अमलात आणु शकत नाही ? का आपल्या प्रायोरिटिज ना योग्य ती प्रायोरिटि देऊ शकत नाही 

एक छोटीशी गोष्ट 

एक छोटीशी गोष्ट च आहे आपल्याला आपल्या ध्येया पासून परावृत्त करत असते ती गोष्ट आहे "भिती " … भीती वाटते लोक काय म्हणतील … भीती वाटते आपण कुठे तरी कळपाच्या मागे राहून जाऊ …. भीती वाटते बदल घडवून आणण्याची चाकोरी च्या सवयी मधून बाहेर पडण्याची …भीती वाटते अपयश येण्याची एकपालक म्हणून… एक ओंफिसर म्हणुन … एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आणि मग जे चालले आहे तेच चालू राहते आणि आपण परिस्थिती पुढे हतबल होऊन स्वतचाच बळी देत जातो . 

भीती लाच भीती दाखवा 

कसे ? खालील मुद्दे वाचा आणि पहा … सगळ काही शक्य आहे 

१] आपल्या "इफ एंड बट्स " लिहून काढा :
हो चक्क एक लिस्ट बनवा आपल्याला हे हे करायचं आहे आणि अस अस होईल असे वाटते म्हणुन आम्ही ते करत नाही … म्हणजे सुरुवातच करत नाही … बघा हे लिहूनच तुम्हाला अर्धी लढाई जिंकल्या सारखे वाटेल 

२] आता भीती ला पळवण्याचे मार्ग शोधा :
आणि हो नुसते लिहायचे नाही करायचे फक्त दिवसातले २ मिनिट . फक्त मोजून २ मिनिट . 
साखर सोडायचीय फक्त एकदा एका चहात साखर न घेऊन बघा … 
सिगरेट सोडायचीय जेवणा नंतरची एक सिगरेट तुमच्याच हाताने मोडून टाकून द्या …
कविता लिहायाचीय फक्त २ मिनिटे कागद पेन घेवून बसा लिहायला सुरुवात करा… 
डोंगरावर तासंन तास जाउन बसायचंय … फक्त एकदा पुणे मुंबई रस्त्यावर कोर्पोरेट ए सी गाडीतून उतरून डोंगरावर पळत जा आणि धावत परत या.
…दिवसातून एकदा २ मिनिटासाठी आपल्या आईला …शाळेतून घरी आलेल्या पिल्लाला फोन करून बघा…. कधीतरी सहज म्हणुन स्मार्ट फोन चक्क स्विच ऑफ करा … आपलच आपल्याला कळेल कठिण काहीच नव्हत … आपण हे २ मिनिटासाठी तरी सहज करू शकतो 

३] नाही जमलं …. आपलंच अपयश एन्जॉय करा

अपयश हि यशाची पहिली पायरी आहे शाळेतला सुविचार आपण मोठे होऊन किती सहज विसरतो …आता तुम्ही तो सुविचार म्हणुन ठीक आहे असा म्हणाल आईन्स्टाइन ने असा विचार केला असता तर बल्ब बघायला मिळाला नसता त्याने तर अस पण कुठे तरी म्हणुन ठेवलय की १००० व्या वेळी बल्ब बनल्यावर ९९९ वेळा बल्ब कसा नाही बनत ते शोधून काढलेच ना . तर आपलंच अपयश एन्जॉय करा पण म्हणुन सोडुन देवू नका तर हात धुवून मागे लागा तुमच्यातला आईन्स्टाइन जागा करा आणि आपल्या अपयशाला च सुधरण्या चा मार्ग समजा 

४] आता हि २ मिनिट वाढवा आणि ४ - ८ मिनिटा वर न्या 
जी पद्ध त तुम्ही तुमच्या अंगी बाणवली आहे ती सहजासहजी आलेली नाही. जेव्हा तुमचे प्रयत्न फेल गेले तर तुम्ही थॊडे काही तरी बदलून बघितले तुम्हाला समजले कि अरे आपण हे नाही केले तर शकतो . हि स्टेप घेतली तर आपण नक्की दिवसात आपले ध्येय मिळवू शकतो . असे शिकव णारे कुठे रेडीमेड पुस्तक मिळणार नाही हे आपलं आपणच शिका यचं आणि हेच सगळ्यात महत्वाचं कौशल्य आपण या संपूर्ण प्रक्रियेत आपोआपच शिकतो  तर मग चला आपल्या आयुष्यातील तथा कथित अडचणी वर मात करायला शिकूया …आजच कोलंबस होऊन नवीन मार्ग शोधुया , नवीन शिखर पार करुया रोज एक नवीन उंची गाठूया