 |
Purushottam Laxman Deshpande ( पुरुषोत्तम
लक्ष्मण देशपांडे) (8 November 1918 – 12 June 2000) was a
Marathi writer from
Maharashtra in India. Apart from his writing, he was also well-known
for his all-round achievements as an accomplished film and stage actor,
music composer,
harmonium player, singer and orator. He wrote in Marathi under the
name पु. ल. देशपांडे ("P. L. Deshpande"), and was popularly known
by just his initials पु. ल. ("Pu. La."). He was also
affectionately called Maharashtrache laadke vyaktimattva or "the
most beloved personality in Maharashtra". |
|
Awards and Recognitions
|
|
|
|
MP3 Downloads |
|
●
माझे पौश्टीक जीवन |
|
●
असामी असा मी |
|
●
म्हैस |
|
|
मोठेपणा याचा अर्थ लक्षात ठेवला पाहीजे. समाजात मोठेपणा असाच मिळत असतो,
कि ज्या वेळेला लोकांना त्याचं आपण अनुकरण करावं असं वाटतं, त्या वेळेला
लोकांनी त्या मोठेपणाला दिलेली ही एक मानवंदना असते.
(.. पु. ल. )
More On |
|
लेखन |
|
अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा?
एकेकाळी रचिली ओवी । व्हाल का हो नवकवी?
मारे बोलविला रेडा । रेघ बी. ए. ची ओलांडा!
तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी गाणी
म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भिंत
चालवून दाखवा झणी । एक नाटक कंपनी
बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्वीकारा
more like
this
|
|
व्यक्तिचित्रे
●
अंतू बर्वा
वास्तविक अंतू बरव्याला कुणी
अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी
बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या
वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस
पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला
होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने
मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे.
रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने
मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे.
तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोह~याचा "'अण्णू'
झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो.
more
|
|
|
|
●
संस्कृती |
|
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची
भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया
ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि
त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा
काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या
नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून
लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या
दिव्या दिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या
गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा
लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची
पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या
समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर
भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर
अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...
कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे
पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके
घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी
हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा
आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा......
more |
|
पुलोपदेश |
|
पु. ल. देशपांडे यांनी अशोक आडारकर यांना
विवाहानिमीत्त पाठविलेले पत्र |
|
more
like this |