फलक.
एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक.
"येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल."
रामायण
हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता.
तो आतापर्यंत परत आलेला नाही.
पाण्याचा पोपट कसा करायचा
पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही
बादलीचा पोपट कसा करायचा
नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही
नळाचा बादलीचा आणि पाण्याचा
पोपट कसा करायचा
नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची
दिल्लीचे तख्त
इतिहासाच्या
तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"
राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "
पुरंदरे मास्तरांनी
हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे
बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले
असेल.
हाय जॅक
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला,
''हाय जॅक!''
... तत्क्षणी हवाई
संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह
निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू
लागले...
... तेवढ्यात समोरून
एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय
टॉम!!!!!''
योजना
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य
क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
कुविचार
दारू हे कुठल्याही प्रश्नचं उत्तर असू शकत नाही...
... ... पण, ती काही
काळासाठी प्रश्नचा विसर तर पाडते!!!
कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना,
मिळतेच...
... आळसाचे फळ मात्र
तात्काळ मिळते!!!!










